चेन्नई येथे पतंजलि योगपिठाच्या ‘ऑनलाईन’ योगवर्गामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नवरात्री’ विषयावर मार्गदर्शन

सौ. सुगंधी जयकुमार

चेन्नई (तमिळनाडू) – पतंजलि योगपिठाच्या वतीने के.के. नगर येथे विनामूल्य ‘ऑनलाईन’ योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीला ‘नवरात्री’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी नवरात्रीला अखंड दीप लावणे, कन्यापूजन आणि कुंकूमार्चन करणे आदींविषयी शास्त्रीय मार्गदर्शन केले. याखेरीज त्यांनी सात्त्विक भेटवस्तू देण्याचे महत्त्व, तसेच सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी जिज्ञासूंचे शंकानिरसन केले.

वैशिष्ट्यपूर्ण

हिंदु जनजागृती समितीने नवरात्रीच्या विविध पैलूंविषयी माहिती दिल्याविषयी योगवर्गाचे समन्वयक श्री. भास्कर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी अशाच प्रकारचा सत्संग त्यांच्या विभागातील दुसर्‍या योग समूहासाठी आयोजित करण्यास सांगितले. त्यांच्या विनंतीप्रमाणे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तुकोटाई (तमिळनाडू) येथील पतंजलि योगवर्गामध्ये ‘नवरात्री’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेण्यात आले.