(म्हणे) ‘रामदेवबाबा यांनी क्षमायाचना न केल्यास त्यांच्याविरुद्ध १ सहस्र कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट करणार !’ – आय.एम्.ए.च्या उत्तराखंड शाखेची चेतावणी

अ‍ॅलोपॅथीवर टीका केल्याचे प्रकरण

  • आय.एम्.ए.चे अध्यक्ष डॉ. जयलाल यांनी एका मुलाखतीत कोरोना संसर्गाचा प्रकोप न्यून होण्याचे श्रेय डॉक्टरांना देण्याऐवजी येशू ख्रिस्ताला दिले होते. या ख्रिस्तीधार्जिण्या वक्तव्याविषयी आय.एम्.ए. त्यांच्यावर दावा प्रविष्ट करण्याचे धारिष्ट्य दाखवणार का ?
  • डॉ. जयलाल यांनी अनेक वेळ धार्मिक विद्वेष निर्माण करणारी वक्तव्ये केली आहेत. ती आय.एम्.ए.ला चालतात का ?
  • आय.एम्.ए.कडून पैसे घेऊन एल्ईडी बल्ब, वॉल पेंट आदी आस्थापनांना ‘अ‍ॅन्टी बॅक्टेरियल’ प्रमाणपत्र देण्यात येते. या भ्रष्टाचाराविषयी आय.एम्.ए.‘ब्र’ही काढत नाही, हे लक्षात घ्या !
डावीकडून योगऋषी रामदेवबाबा आणि डॉ. जॉन रोज जयलाल

नवी देहली – अ‍ॅलोपॅथीविषयी केलेल्या वक्तव्यावरून भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (इंडियन मेडिकल असोसिएशनच्या) उत्तराखंड येथील शाखेने योगऋषी रामदेवबाबा यांना येत्या १५ दिवसांत क्षमायाचना न केल्यास त्यांच्याविरुद्ध १ सहस्र कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट करण्याची चेतावणी दिली आहे. योगऋषी रामदेवबाबा यांनी ‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख आणि दिवाळखोर शास्त्र असल्याचे विधान केले होते.

यासह ‘रामदेवबाबा यांनी ७२ घंट्यांच्या आत त्यांच्या पंतजलि आस्थापनाच्या कोरोनिल किटचे दिशाभूल करणारे विज्ञापनही सर्व ठिकाणांहून मागे घ्यावे’, अशीही मागणी भारतीय वैद्यकीय संघटनेने (एम्.आय.ए.ने) केली आहे. पतंजलिकडून कोरोनिल हे औषध कोरोना लसीकरणानंतर होणार्‍या ‘साईड इफेक्ट्स’वर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.