Nepal Earthquake : नेपाळमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : ९५ जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये ७ जानेवारीला सकाळी ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये ९५ जणांचा मृत्यू झाला, तर ६२ जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वी नेपाळमध्ये एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये अनुमाने १० सहस्र लोक मृत्यूमुखी पडले होते.