श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी मूल्याकनकर्त्यांची नियुक्ती ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती

भाविक ज्या श्रद्धेने देवाला दागिने देतात, त्यांचे योग्य मूल्यांकन होण्यासाठी अधिकृत मूल्यांकनकर्ते प्रत्येक देवस्थानासाठी असणे अपेक्षित आहे !

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या इचलकरंजी विभागात १३ कोटी रुपयांचा अपहार

पेंढारी याने २१२ वखार पावत्यांवरील सुमारे सव्वा सहा लाख रुपये वखार भाडे भरलेच नाही. खोटा ‘यूटीआय’ क्रमांक देऊन महामंडळाच्या अधिकोषात पैसे जमा झाल्याची माहिती दिली.

मुंबईतील लघुवाद न्यायालयातील अनुवादकाला २५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

निकाल बाजूने देण्यासाठी अनुवादकाने एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करतो, हा प्रकार संशयास्पद आहे. यामध्ये न्यायव्यवस्थेतील आणखी कुणी वरिष्ठ पदाधिकारी आहेत का ? या दृष्टीनेही अन्वेषण व्हावे !

Trinamool MP Jawhar Sircar quits : तृणमूल काँग्रेसचे नेते जवाहर सरकार यांचे खासदारकीचे त्‍यागपत्र

तृणमूल काँग्रेसच्‍या नेत्‍यांनाही ममता बॅनर्जी यांची निष्‍क्रीयता दिसते; पण केंद्र सरकारला का दिसत नाही ? सरकार आता तरी बंगालच्‍या हितासाठी बंगाल सरकार विसर्जित करून तेथे राष्‍ट्रपती राजवट लागू करणार का ?

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक यांसह ७ लाचखोर अधिकार्‍यांना मुंबईत अटक !

एका खासगी व्यावसायिकाकडून त्याच्यावर गुन्हा नोंद न करण्यासाठी या अधिकार्‍यांनी ८० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामध्ये ६० लाख रुपयांपर्यंत तडजोड झाली.

३ भ्रष्ट मोटर परिवहन निरीक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

वाहनांच्या साधनसामग्रीच्या नावाखाली प्रती वाहनामागे २५ सहस्र रुपये मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परीक्षित पाटील, संतोष काथार, धनराज शिंदे या मोटर परिवहन निरीक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Kolkata Doctor Case : प्रकरण दडपण्यासाठी पोलीस अधिकार्‍याने आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला ! – मृत महिला डॉक्टरच्या पालकांचा पोलिसांवर आरोप

सीबीआयने या आरोपाचीही चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड केले पाहिजे !

नागपूर येथील सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

मुंबई सीबीआय पथकाने नाशिकमध्ये वरिष्ठ विपणन अधिकार्‍याला लाच घेतांना पकडले !

अशा प्रकरणांमुळे ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ असे होण्याऐवजी ‘भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेला भारत’ अशीच प्रतिमा निर्माण होत आहे. हे पालटण्यासाठी महत्त्वाच्या खात्यांमध्ये राष्ट्रप्रेमी आणि प्रामाणिक व्यक्ती असणे आवश्यक !

संपादकीय : भ्रष्टाचाराला चाप !

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशातील सरकारी कर्मचार्‍यांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक झालीच पाहिजे !