
मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गाण्याद्वारे अवमान करणारा स्टँडअप कॉमेडियन (एकट्याने विनोद करणारा कलाकार) कुणाल कामरा याने अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याला ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
कुणाल कामरा, सुषमा अंधारे यांच्यावरील हक्कभंग मान्य
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी स्टँडअप कॉमेडियन (एकट्याने विनोद करणारा कलाकार) कुणाल कामरा आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात प्रविष्ट केलेला हक्कभंग मान्य करण्यात आला आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांचा हक्कभंग स्वीकारला आहे. सभापती राम शिंदे यांच्या स्वाक्षरीनंतर हा प्रस्ताव विधिमंडळाच्या हक्कभंग समितीकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी या दोघांनाही नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. |