परिवहन विभागातील अपव्यवहार प्रकरणी बजरंग खरमाटेच्या चौकशीची मागणी !

परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे

मुंबई – भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे याच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारातील सहभागावर प्रश्न उपस्थित केला. स्थानांतर प्रक्रियेत हस्तक्षेप, अधिकार्‍यांना धमकावून शासनाच्या विरोधात काम करण्यास प्रवृत्त करणे आणि आर्थिक वसुलीचे आरोप त्याच्यावर आहेत. नागपूर पोलिसांनी २५ जानेवारी २०२४ या दिवशी अहवाल दिला असूनही कारवाई झालेली नाही. दरेकर यांनी खरमाटेच्या अटकेविषयी काही करणार का ? असा प्रश्न उपस्थित करत आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अपप्रकार थांबवण्याचे आश्वासन देत आर्थिक गुन्ह्यांची चौकशी केली जाईल, असे सांगितले.