तुळजापूर (धाराशिव) मंदिरातील सशुल्क दर्शन बंद करण्याची मागणी !
अशी मागणी भाविकांना का करावी लागते ? मंदिरात योग्य नियम असण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !
अशी मागणी भाविकांना का करावी लागते ? मंदिरात योग्य नियम असण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !
जिल्ह्याचे अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून सातत्याने उद़्भवणार्या नैसर्गिक आपत्तींमुळे येथील दरडोई उत्पन्न अत्यंत अल्प आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये व्हीआयपी (अतीमहनीय व्यक्ती) दर्शन पासमध्ये सावळा गोंधळ चालू असल्याची चर्चा सामाजिक माध्यमांत होत आहे. व्हीआयपी रजिस्टरमधील नोंदी आणि प्रत्यक्षात सीसीटीव्ही चित्रण यांमध्ये तफावत आहे.
मंदिर प्रशासनाने स्थानिक पुजारी आणि व्यापारी यांना विश्वासात घेऊन विकास आराखडा सिद्ध करणे अपेक्षित होते. घाडशीळ येथे दर्शन मंडप उभारणे भक्तांसाठी गैरसोयीचे होणार आहे.
तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनवतांना मंदिराच्या रूढी-परंपरा आदी सर्व गोष्टी विचारात घेणे आवश्यक !
श्री तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास काही पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिक यांचा विरोध आहे.
श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात, तसेच संबळाच्या निनादात ६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी मंचकी निद्रेचा विधी पार पडला. प्रारंभी पंचामृत अभिषेक, विधीवत् पूजन आणि आरतीनंतर श्री तुळजाभवानीदेवीला शयनगृहात नेण्यात आले.
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यास तेथे कशा प्रकारे व्यवहार चालतात, याचे हे उदाहरण होय ! त्यामुळे मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !
अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करण्यापूर्वीच कसा फुटला ? एक अहवालही सांभाळू न शकणारे मंदिराचे प्रशासन देवीचे अलंकार कधीतरी सांभाळू शकेल का ?
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी ४५ सहस्र कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. यात सिंचनासाठी २७ सहस्र कोटी रुपयांच्या निधीला संमती देण्यात आली आहे