जळगाव – पुणे सायबर सेलने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहारप्रकरणी संशयास्पद युजर आयडी वापरून तिकीटे बनवणार्या ज्ञानेश्वर गुलाब पाटील याला अटक केली आहे. त्याच्याकडून २४३ ई-तिकिटे जप्त करण्यात आली असून त्याचे मूल्य ४ लाख २० सहस्र ९६२ रुपये इतके आहे. यात ८८ आगाऊ आणि १५५ प्रवास पूर्ण झालेल्या तिकिटांचा समावेश आहे. अवैध तिकीट नोंदणीसाठी वापरण्यात आलेला ‘रेडमी’ आस्थापनाचा भ्रमणभाषही जप्त करण्यात आला. या प्रकरणी रेल्वे अधिनियम १९८८ च्या कलम १४३ अंतर्गत गुन्हा नोंद करून बी.एन्.एस्.एस्. कायदा २०२३ च्या कलम ३५ (३) नुसार त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.