
सातारा, २८ मार्च (वार्ता.) – येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाची सांगता होणार आहे. यानिमित्त २९ मार्च या दिवशी कोडोलीमधील भोसले चौक येथे सायंकाळी ७ वाजता सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाला ‘आकार डीजी ९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता मूकपदयात्रा होणार आहे, तरी समस्त शिव-शंभूप्रेमींनी मूकपदयात्रेत सहभागी व्हावे, तसेच जाहीर व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.