लोकसेवकास लाच देण्याचे प्रलोभन दाखवणार्‍या धर्मांध वायरमनला अटक

मुंब्रा येथील रिबा रेसिडेन्सी येथे केलेल्या विजेच्या चोरीवर कारवाई करू नये आणि येथील २७ मीटर जोडून द्यावेत, यासाठी इरफान अब्दुल गफूर पटेल (वय ४९ वर्षे) याने लोकसेवकाला ३० सहस्र रुपये देऊ केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

कल्याण येथील पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी लाचखोरीप्रकरणी अटकेत

गुटखा वाहतुकीची खोटी तक्रार प्रविष्ट न करण्यासाठी कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीष कांबळे, तसेच हवालदार अंकुश नरवणे आणि भरत खाडे यांनी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.