डेन्मार्कमध्येही बुरखा आणि हिजाब घालण्यावर बंदी

डेन्मार्कने अन्य युरोपियन देशांप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे. डेन्मार्कच्या संसदेने या संदर्भात कायदा संमत केला आहे. मानवी अधिकार कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

‘जमात-ए-इस्लामी हिंद’ संघटनेकडून हिंदूंसाठी मस्जिद परिचय उपक्रमाचे आयोजन !

हिंदु धर्मियांच्या मनातील इस्लामविषयीचे अपसमज आणि धार्मिक तेढ दूर करण्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ या संघटनेने ‘मस्जिद परिचय’ उपक्रम आयोजित केला आहे. या माध्यमांतून अन्य धर्मियांसाठी, विशेषतः हिंदूंसाठी मशिदीचे दरवाजे उघडले जात आहेत.

जगात २२ हून अधिक इस्लामिक देशांत तोंडी तलाकला कायदेशीर बंदी ! – डॉ. शमशुद्दिन तांबोळी, अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मंडळ

जगात २२ हून अधिक इस्लामिक देशांत ‘तोंडी तलाक’ प्रथेला कायदेशीर बंदी आहे; परंतु भारतात जमातवादी मुस्लीम आणि अखिल भारतीय मुस्लीम ‘व्यक्तिगत कायदा मंडळ’ या विषयावर समाजाची आणि मुसलमान महिलांची दिशाभूल करत आहेत.

१० वर्षांनंतर केरळ राज्य ‘इस्लामी राज्य’ होईल ! – चित्रपट निर्माते सुदीप्तो सेन

जेएन्यूमध्ये साम्यवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुदीप्तो सेन यांच्या ‘इन नेम ऑफ लव्ह’ या लघुपटाचा निषेध करून त्याचे प्रदर्शन उधळून लावले होते.

गोमांसाची गुणवत्ता वाढण्यासाठी गोहत्येपूर्वी गायीला कुराण ऐकवा ! – मलेशियातील केलांतन राज्य सरकार

गोमांसाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मलेशियातील केलांतन राज्याच्या सरकारने गोहत्येपूर्वी कुराणातील आयते ऐकवण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदु पत्नीने इस्लामचा स्वीकार करण्यास नकार दिल्याने मुसलमान पतीकडून तिची खासगी छायाचित्रे प्रसारित

येथील एका हिंदु महिलेने पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार तिच्या दानिश अन्सारी नावाच्या मुसलमान पतीने तिची खासगी छायाचित्रे मित्रांमध्ये प्रसारित केली आहेत, असे वृत्त इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाइम्स नाऊ’ने प्रसारित केले आहे.

सौदी अरेबियाच्या आर्थिक साहाय्याद्वारे इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात बांगलादेशमध्ये शेकडो मशिदींची निर्मिती

मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये इस्लामी कट्टरतावाद रोखण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करून एक योजना राबवण्यात येत आहे. यासाठी सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्य मिळत आहे.

शासनाने शरियतमध्ये हस्तक्षेप करू नये ! – ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड

तलाकच्या संदर्भातील नियम आम्हाला मान्य आहेत. त्यामुळे शासनाने शरियतमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी मागणी तिहेरी तलाकच्या विरोधात आझाद मैदानावर जमलेल्या सहस्रावधी मुसलमान महिलांनी केली. ३१ मार्च या दिवशी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने तिहेरी तलाकच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाला महिला आल्या होत्या.

इस्लाममधील तिहेरी तलाक, निकाह, हलाला आणि बहुपत्नीत्व या प्रथांवर बंदी घालण्याची मुसलमान महिलेची न्यायालयात याचिका

पतीने दुसरा निकाह करून हलालासाठी दबाव आणल्याचा आरोप करत नालासोपारा येथील एका पीडित मुसलमान महिलेने याविषयी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

पोस्टाद्वारे ट्रिपल तलाक देणार्‍या पतीच्या विरोधात महिलेची पोलिसात तक्रार

भिवंडी येथील शबनम या मुसलमान महिलेला तिच्या पतीने पोस्टाने १०० रुपयांच्या स्टँम्पवर ट्रिपल तलाक पाठवला होता. याच्या विरोधात पीडित महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात पती सरदार याच्या विरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार प्रविष्ट केली आहे.