देयकाच्या नावात पालट करण्यासाठी लाच मागणारा कर्मचारी कह्यात !

प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांनी लाच मागणे लज्जास्पद !

मुरगांव (जिल्‍हा गडचिरोली) येथील लाचखोर सरपंचाला अटक !

जिल्‍ह्यातील धानोरा तालुक्‍यातील मुरगांव येथील सरपंच मारोती गेडाम (वय ५० वर्षे) यांनी तक्रारदाराच्‍या रस्‍ता बांधकामाच्‍या धनादेशावर स्‍वाक्षरी करून देण्‍याच्‍या कामासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतली.

Adani Group : कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकार्‍यांना दिली २ सहस्र कोटी रुपयांची लाच !

अशा सतत करण्यात येणार्‍या आरोपांद्वारे भारतात आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे का ? याचाही शोध भारताने घेणे आवश्यक आहे !

सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीत घोटाळा झालेल्‍या ‘बिटकॉईन’मधील पैसा वापरला !

खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी ‘बिटकॉईन’ या आभासी चलनातील कथित घोटाळ्‍याचे पैसे वापरले. ही रक्‍कम कोट्यवधी रुपयांची आहे, असा आरोप रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे.

Railway DRM Arrested : आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम्‌च्‍या लाचखोर विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापकाला अटक !

सौरभ प्रसाद यांनी एका निविदेच्‍या संदर्भात कंत्राटदाराकडून २५ लाख रुपयांची मागणी केली होती. लाच घेण्‍यासाठी तो मुंबईला पोहोचला तेथे त्‍याला पकडले.

राजकीय पक्षांच्या निधीचे गौडबंगाल !

जे राजकीय पक्ष त्यांना मिळणारा निधी जगजाहीर करण्यास बचावात्मक भूमिका घेतात, ते देशात पारदर्शी कारभार आणू शकतील का ?

गोव्यात सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणाचे राज्यभर लोण !

सरकारी खात्यांमध्ये नोकर्‍या मिळवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. या प्रकरणी सर्वसामान्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे, तसेच सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता टिकून राहावी, यासाठी नोकरी घोटाळा प्रकरणाचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे.

ED Raids : झारखंड आणि बंगाल राज्यांत ‘इडी’च्या १७ ठिकाणी धाडी !

यातून बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणात पोलिसांचे साटेलोटे असल्याची शक्यता दाट आहे, हेच म्हणता येईल. अशांविरुद्धही कठोर कारवाई झाली पाहिजे !

१ लाख रुपयांची लाच घेतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपाई अटकेत !

नया नगर पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपायाला ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक केली.