प्रत्युत्तरात काँग्रेसचा माकपवर अशाच प्रकारचा आरोप
थिरूवनंतपूरम् (केरळ) – राज्यातील वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रथम सार्वत्रिक निवडणुकीत राहुल गांधी आणि नंतर पोटनिवडणुकीत त्यांची मोठी बहिण प्रियांका वाड्रा यांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ‘राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांच्या वायनाडमधील विजयामागे कट्टरतावादी मुसलमान आघाडीचा हात होता’, असा आरोप केला आहे.
१. सुलतान बाथरी येथे वायनाडमधील माकपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी माकपचे नेते विजयराघवन् म्हणाले की, ‘वायनाडमधून लोकसभेवर २ जण निवडून गेले. पहिले राहुल गांधी आणि आता प्रियांका वाड्रा. ते कुणामुळे निवडून आले ? कट्टरतावादी मुसलमान आघाडीच्या पाठिंब्यामुळेच ते वायनाडमध्ये जिंकले. या आघाडीच्या पाठिंब्याविना राहुल गांधी संसदेत पोचू शकले नसते. ते आता विरोधी पक्षनेते आहेत. प्रियांका वाड्रा यांच्या वायनाडमध्ये अनेक प्रचारफेर्या झाल्या. त्यांच्या त्या प्रचारफेर्यांमध्ये सर्वांत पुढच्या आणि मागच्या रांगेत कोण होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? अल्पसंख्यांकांमधील सर्वांत वाईट अतिरेकी विचारांचे लोक त्या फेर्यांमध्ये होते. हे अतिरेकी विचारांचे लोक काँग्रेस नेतृत्वासमवेत आहेत.
२. विजयराघवन् यांनी यापूर्वीही काँग्रेसवर अशा प्रकारचे आरोप केले आहेत. तसेच माकपने वर्ष २०१४ मध्ये अशीच भूमिका घेतली होती. त्या वेळी लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस आणि कट्टरतावादी मुसलमान संघटना यांचा संबंध जोडला होता. यावर्षी एप्रिल महिन्यातही माकपाने असेच आरोप केले होते.
माकपने लोकसभेत मुसलमानांसाठी पॅलेस्टाईनचे सूत्र उपस्थित केले ! – काँग्रेसचा आरोप
काँग्रेसने आता माकपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माकपने केवळ मुसलमान मतदारांना आकर्षित करण्यासाठीच पॅलेस्टाईनचे सूत्र उपस्थित केले होते. ज्यामुळे हिंदु मतदार त्यांच्यावर नाराज झाले. त्यामुळेच माकप आता हिंदु मतदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे.
संपादकीय भूमिकादोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत आणि त्यांना मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवायची आहेत. दोन्ही पक्ष कट्टर मुसलमानधार्जिणे आहेत. हे हिंदूंनी लक्षात घ्यावे आणि त्यांना दूर ठेवावे ! |