Andhra Pradesh Hindus Temples : मंदिरांच्या वैदिक परंपरा आणि चालीरिती यांचे पावित्र्य राखा ! – आंध्रप्रदेश सरकारचा खातेप्रमुखांना आदेश

‘आंध्रप्रदेश धर्मादाय आणि हिंदु धार्मिक संस्था कायदा, १९८७’च्या कलम १३ (अ) च्या अंतर्गत ‘वैदिक परंपरांच्या प्रकरणांमध्ये मंदिरांना स्वायत्तता सुनिश्‍चित करा आणि मंदिरांच्या चालीरिती अन् परंपरा यांचे पावित्र्य राखण्यामध्ये कुठलेच अडथळे आणू नका’, असा आदेश आंध्रप्रदेश सरकारने सर्व खातेप्रमुखांना दिला.

शाळेतील शिक्षक आणि अन्य कर्मचारी यांची माहिती लपवली !

९२ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश

UP Women Commission Proposal : पुरुषांना महिलांच्या कपड्यांचे मोजमाप करण्यास मज्जाव !

कानपूरमध्ये एकता गुप्ता हत्याकांडानंतर एका बैठकीत महिलांच्या सुरक्षेशी संबंधित सूत्रांवर चर्चा झाली आणि काही नवीन प्रस्ताव योगी आदित्यनाथ सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी हा एक आहे.

आळंदीतील कार्तिकी यात्रा काळात भाविकांची असुविधा टाळणार ! – दौन्डे, प्रांताधिकारी

आळंदीत कार्तिकी यात्रा अर्थात् ‘माऊली’च्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या सिद्धतेचा नियोजन पूर्व आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी दौन्डे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी नगर परिषद सभागृहात आढावा बैठक झाली.

Telangana Again Idol Vandalized : तेलंगाणामध्ये माता पोचम्मा थल्ली देवीच्या मूर्तीची तोडफोड !

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात, तशीच आक्रमणे पाकिस्तान आणि बांगलादेश येथेही होतात, हे लक्षात घ्या !

QR Identification Of Doctors : ‘क्यूआर् कोड’द्वारे आधुनिक वैद्यांची ओळख पटवता येणार !

बोगस आधुनिक वैद्यांना आळा बसावा आणि सर्वसामान्य नागरिकांना नोंदणीकृत आधुनिक वैद्यांची माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एम्.एम्.सी.ने) विशेष अ‍ॅप सिद्ध केले आहे.

SC On Bulldozer Action In UP: रातोरात बुलडोझर कारवाई नको !

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही अशा प्रकारे लोकांची घरे कशी काय उदध्वस्त करू शकता ? ही संपूर्णत: अराजकता नाही का ? तुम्ही कुटुंबाला घर रिकामे करण्याचा वेळही देत नाही.

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे अन्य मंदिरांनी भाविकांना टिळा लावण्याचा निर्णय घ्यावा ! – मंदिर महासंघ

मुंबई येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणून टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे.

NCP Ajit Pawar Group Manifesto : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त प्रतिमास २ सहस्र १०० रुपये देण्याचे आश्‍वासन !

जनतेच्या करातून मिळणार्‍या पैशातून जनतेसाठी सोयीसुविधा निर्माण करून देण्याऐवजी अशा पद्धतीने पैसे वाटण्याची घोषणा करून मते विकत घेण्याचा प्रयत्न करणार्‍या पक्षांना निवडणूक आयोगाने जाब विचारला पाहिजे !

‘मराठी भाषा अधिकारी’ किती कृतीप्रवण आहेत ? मराठी भाषा विभाग घेणार आढावा !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘राज्यात मराठी भाषा सक्षम व्हावी’, यासाठी वर्षभराच्या कामाचा आढावाही मराठी भाषा विभागाकडून सिद्ध करण्यात येत आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाकडून देण्यात आली.