तोरणागडाच्या बिन्नी दरवाजा मार्गावर ‘रेलिंग’चे काम अखेर चालू !
तोरणागडाच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय केला जात असतांना पर्यटकांच्या सुरक्षेकडे मात्र पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले होते. उंच कड्यात संरक्षक कठडे (रेलिंग) नसल्याने पर्यटकांना अक्षरशः जीव मुठीत धरून चढउतार करावी लागत आहे.