नांदुरा (जिल्हा हिंगोली) पाणीपुरवठासंबंधी त्रयस्थ आस्थापनांकडून चौकशी !

मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – नांदुरा (ता. जि. हिंगोली) येथील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा बंद पडल्यामुळे ७ जानेवारी २०२५ या दिवशी आंदोलन केले होते. त्या प्रकरणी उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कळमनुरी आणि त्रयस्थ तांत्रिक पडताळणी संस्था म्हणून ‘टाटा कन्सल्टींग इंजिनीयर्स लि.’ यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. नांदुरा येथील विहिरीच्या जागेचा प्रश्न ग्रामपंचायतीकडून नोंदणीकृत दानपत्र घेऊन निकाली काढण्यात आला आहे, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेमध्ये दिली. याविषयी काँग्रेसच्या आमदार श्रीमती प्रज्ञा सातव यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, ‘हर घर जल’ या योजनेतून २०१९ साली हिंगोली जिल्ह्यातील ६१४ गावांना पाणीपुरवठ्याला मान्यता देण्यात आली होती. त्यातील १८० गावांमध्ये ही योजना पूर्ण झाली आहे. १९० गावांमध्ये ते काम ८० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. इतर ठिकाणीच्या कामांमध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी ३३७ ठेकेदारांना ९१ लाख रुपयांचा दंड केला आहे