ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ घोषित !

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर

पुणे – ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि देशाचे धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी वर्ष २०२५ चा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतला आहे. त्याचसह सीमेवर लढतांना घायाळ झालेले सैनिक आणि वीरमातांनाही सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पुण्यभूषण’ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली आहे. यंदा या पुरस्काराचे ३७ वे वर्ष आहे. सलग ३६ वर्षे या प्रतिष्ठित पुरस्काराचा भव्य उपक्रम संस्थेने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि विदेशातही यशस्वीपणे राबवला आहे.