मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

शहरांमधील बेसुमार गर्दी, स्वच्छतेचा अभाव, वाढते प्रदूषण, रज-तम यांचे अधिक प्राबल्य आदींमुळे तेथील नागरिक भीती आणि असुरक्षितता यांच्या सावटाखाली वावरतांना दिसत आहेत. युद्धजन्य परिस्थिती, दंगली, त्सुनामी, रोगराई आदी आपत्तींच्या वेळी ही शहरे गावापेक्षा अधिक संकटात असू शकतात. त्यामुळे तेथे रहाणे धोक्याचे ठरू शकते.

कोळसा प्रदूषणामुळे वास्को येथे कोरोनाचे सर्वाधिक बळी ! – ‘गोयचो आवाज’

शहर आणि जवळच्या परिसरात कोळसा प्रदूषणामुळे कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत, असा दावा वास्को शहरातील कोळसा प्रदूषणाच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणार्‍या ‘गोयचो आवाज’ या अशासकीय संघटनेने केला आहे.

नीरा नदी प्रदूषित करणार्‍या आस्थापनाला ६ कोटींची हानीभरपाई देण्याचा आदेश

गणेशमूर्ती विसर्जनामुळे नद्या प्रदूषित होतात, असा कांगावा करणार्‍या अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ? नद्यांचे प्रदूषण होण्याची कारणे पुढे येत असतांना हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर आच आणणारे तथाकथित पर्यावरणप्रेमी आता का बोलत नाहीत ?

प्रदूषणामुळे भारतियांचे आयुर्मान ५.२ वर्षांनी घटले ! – शिकागो विद्यापिठाच्या अभ्यासातील निष्कर्ष

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे भारतियांचे आयुर्मान ५.२. वर्षांनी घटले आहे, असे अमेरिकेतील शिकागो विद्यापिठाच्या ‘द एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्युट’ने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.

देहलीत संचारबंदी केल्यामुळे प्रदूषणात कमालीची घट

कोरोनाचा असाही परिणाम ! आता देहलीतील नागरिक काही दिवस तरी स्वच्छ हवा अनुभवतील !

 लोकांना मरण्यासाठी सोडले आहे ! – सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर ताशेरे

न्यायमूर्ती म्हणाले, ‘‘आपण आपल्या जीवनातील महत्त्वाची वर्षे यामुळे गमावत आहोत. स्थिती अत्यंत बिकट आहे. केंद्र आणि देहली सरकार काय करू इच्छित आहे ? तुम्ही हे प्रदूषण अल्प करण्यासाठी काय करणार आहात ? . . . आम्ही हे सहन करू शकत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट हसण्यावारी घेत आहात.’’

…अन्यथा भावी पिढ्यांना केवळ चित्रांमध्ये झाडे पहायला मिळतील ! – मुंबई उच्च न्यायालय

विकास प्रकल्पांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात आणि अनिर्बंधपणे झाडे तोडली जाऊ नयेत की, भावी पिढ्यांना मेट्रो रेल्वेमध्ये झाडांची चित्रे किंवा केवळ चित्रांमध्ये झाडे पहायला मिळतील, अशा प्रकारे वृक्षतोडीविषयीची चिंता मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली.