सातारा, ९ मार्च (वार्ता.) – सातारा नगरपालिकेचा गुरुवार परज येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स विकासाचा प्रकल्प लवकरच मार्गी लागत आहे. या परिसरातील मैदानावर अनधिकृतपणे टपर्या आणि पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. ही अतिक्रमणे सातारा नगरपालिकेच्या वतीने काढण्यास प्रारंभ करण्यात आला. ७ मार्च या दिवशी टपरीधारक आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांच्यामध्ये वाद झाला. सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ठोस भूमिका घेत शहर विद्रुपीकरणाला आळा घालण्यास प्रारंभ केला आहे.