लोणी कॉर्नर ते कवडी पाट पथकर नाक्यापर्यंत वाहनांच्या ५ किलोमीटर रांगा !

लोणी काळभोर (पुणे) – पुणे शहरात अवजड वाहनांना बंदी घातल्याने कवडीपाट पथकर नाक्यापासून लोणीपर्यंत ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूककोंडी झालेली होती. शहरात अवजड वाहनचालकांनी भरधाव वेगाने गाडी चालवल्याने अपघात होत आहेत. हे टाळण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घातली असतांना वाहनचालक नियम तोडून शहरात घुसत होते. त्यांना आळा घालण्यासाठी अवजड वाहने रोखून पुन्हा माघारी पाठवण्यात आलेली आहेत.