TDP MP 3rd Child Offer : महिलेला तिसरे अपत्य मुलगा झाल्यास गाय देणार आणि मुलगी झाल्यास ५० सहस्र रुपये देणार !

आंध्रप्रदेशातील तेलुगु देसम् पक्षाचे खासदार कालिसेट्टी अप्पलनायड यांची घोषणा

तेलुगु देसम् पक्षाचे खासदार कालिसेट्टी अप्पलनायड

विजयनगरम् (आंध्रप्रदेश) – येथील तेलुगु देसम् पक्षाचे खासदार कालिसेट्टी अप्पलनायड यांनी आंध्रप्रदेशात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना घोषणा केली की, जर एखाद्या महिलेने तिसरे अपत्य म्हणून मुलीला जन्म दिला, तर तिला त्यांच्या पगारातून ५० सहस्र रुपये दिले जातील आणि जर मूल मुलगा असेल, तर तिला गाय दिली जाईल.

१. खासदार अप्पलनायडू यांनी त्यांच्या घोषणेच्या संदर्भात स्पष्टीकरण देतांना सांगितले की, लोकसंख्या वाढीसाठी केल्या जाणार्‍या उपायांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नायडू यांचे आवाहन आणि त्या दोघांनी तिसरे मूल जन्माला घालण्यासाठी दिलेल्या प्रस्तावानंतर अनुषंगाने माझी ही घोषणा आहे. आम्ही महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत असून तिसरे मूल जन्माला घातल्यास आम्ही प्रोत्साहन देऊ.

२. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बाळंतपणाच्या काळात सर्व महिला कर्मचार्‍यांना  त्यांच्या मुलांची संख्या कितीही असली, तरी प्रसूती रजा दिली जाईल, अशी घोषणा एका कार्यक्रमात केली होती. याच्या माध्यमातून येत्या काही वर्षांमध्ये एकप्रकारे राज्यातील तरूणांची संख्या वाढवण्यासाठी महिलांनी शक्य असतील तेवढ्या मुलांना जन्म द्यावा, असा संदेश देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

हे साहाय्य हिंदु महिलांना देणार  कि अन्य धर्मियांना ?, हेही खासदारांनी तेस्पष्ट करणे आवश्यक आहे; कारण अधिक अपत्ये कोण जन्माला घालतात, हे वेगळे सांगायला नको !