
ठाणे, २३ मार्च (वार्ता.) – अंबरनाथ येथे ७ वर्षांच्या बालिकेवर ६ वर्षांपूर्वी आशुतोष चौबे (वय ३३ वर्षे) याने लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी त्याला २३ वर्षे सश्रम कारावास आणि ६ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (अशा प्रकारे सर्वच अत्याचारांना कठोर शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)