Bahraich Bulldozer Action : बहराइच (उत्तरप्रदेश) येथे उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अवैध मदरशावर चालवला बुलडोझर !

अवैध मदरसा बुलडोझरने पाडण्यात येताना

बहराइच (उत्तरप्रदेश) – उयेथे उच्च न्यायालयाच्या आदेशावरून माटेरा पोलीस ठाण्याच्या परिसरात सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधलेला एक मदरसा बुलडोझरने पाडण्यात आला. नानपाराच्या  तहसीलदार अंबिका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने  घटनास्थळी पोलीस पथक तैनात करण्यात आले होते.

नानपारा तहसीलच्या माटेरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील बुलबुल नवाज गावातील सरकारी भूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून एक मदरसा चालवला जात होता. याविषयी गावातील रहिवासी रफिक यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) करून ती भूमी रिकामी करण्याची मागणी केली होती. खटल्याच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने मदरसा हटवण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार, तहसीलदार अंबिका चौधरी, नायब तहसीलदार अक्षय पांडे, कानुंगो राम सजीवन पांडे हे इतर कामगारांना समवेत घेऊन घटनास्थळी पोचले. मदरसा बुलडोझरने पाडण्यात आला आणि ती जागा मोकळी करण्यात आली.

संपादकीय भूमिका

अवैध मदरसा उभा राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? दोषी प्रशासकीय अधिकार्‍यांनाही सेवेतून बडतर्फ करा आणि अतिक्रमण काढण्यासाठी लागलेले खर्च त्यांच्याकडून वसूल करा !