Uttarakhand forest fire : उत्तराखंडच्या जंगलात लागलेली आग अद्यापही धुमसत आहे !

गेल्या ४ दिवसांपासून उत्तराखंडमधील नैनिताल येथील जंगलात लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. ही आग धुमसत असून ती आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी, अग्नीशमन दल, पोलीस आणि सैनिकही प्रयत्न करत आहेत.

PM Modi In Goa : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सांकवाळ (गोवा) येथे सभा

या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गोवा विभागाने आज राष्ट्रीय महामार्ग ५६६ वर दाबोळी विमानतळ जंक्शन ते बिर्ला क्रास जंक्शन या मार्गावर काही ठिकाणी रस्ता बंद, तर काही ठिकाणी वाहतुकीत पालट केल्याचे कळवले आहे.

हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

बलसा खुर्द (जिल्हा परभणी) येथे २६ एप्रिलला मतदानाच्या वेळी १ सहस २९५ ग्रामस्थांनी गावात कामे करण्यात आली नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला होता; मात्र जिल्हाधिकार्‍यांनी आश्वासन दिल्यावर मतदान केले.

मंदिर परिसरातही भेसळयुक्त मिठाई !

प्रतिवर्षी दिवाळी, गणेशोत्सव जवळ आली की, भेसळयुक्त मिठाई विकण्याचे पेव गेल्या काही वर्षांपासून धार्मिक स्थळांपर्यंत येऊन पोचले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची ही पहिली वेळ नव्हे.

Bajrangdal Chikmagalur : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या माजी पदाधिकार्‍यांना तडीपारीचा आदेश !

काँग्रेस सरकार हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचा आदेश कधीच देत नाही, हे लक्षात घ्या !

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !

कोट्यवधी रुपयांची थकबाकी करणारी महापालिका जिल्ह्याचा कारभार कशी करत असेल ? संबंधित अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी घेतली विविध संघटना, व्यावसायिक, उद्योजक यांची भेट

भेटींमध्ये औद्योगिक क्षेत्रातील गद्रे मरीनचे दीपक गद्रे, जागृत मोटर्सच्या रेश्मा जोशी, प्रसिद्ध अधिवक्ता प्रदीप नेने यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली.

देशाला सुरक्षित आणि विकसित कोण करू शकतो ? याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे. वर्ष २०२६ नंतर हा अर्धा मंच महिलांचा असेल. समाजाच्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत.

शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव !

वर्ष २००९ मध्ये ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर संस्थेचे शैक्षणिक कार्य गतीमान झाले.

China Tibetan Army:चीन तिबेटी तरुणांना सैन्यात भरती करून त्यांना भारताच्या विरोधातील युद्धात उतरवणार !  

भारतद्वेषाने पछाडलेला चीन भारतावर मात करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे हे उदाहरण. अशा चीनशी दोन हात करण्यासाठी भारताने सर्वच स्तरांवर सक्षम होणे आवश्यक !