नात्याला काळीमा फासणारी घटना !

उल्हासनगर, २३ मार्च (वार्ता.) – येथे रहाणार्या ११ वर्षांच्या मुलीवर वडिलांनी अत्याचार केले. वर्गशिक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वडिलांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांना आरोपीला अटक केली आहे, तर मुलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार चालू असून अन्वेषण चालू आहे. शाळेत मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श याविषयी माहिती दिली जात असतांना मुलीने याविषयी वर्गशिक्षिकेला सांगितले. मुलीचे आई वडील गेल्या काही वर्षांपासून विभक्त रहात असून दोन्ही मुलींचा ताबा वडिलांकडे आहे.