‘हिंदु राष्ट्र-जागृती सभां’च्या प्रसारासाठीच्या ‘होर्डींग्ज’ची कलाकृती (आर्टवर्क) आणि निमंत्रणपत्रिका उपलब्ध ! 

आगामी काळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला गती मिळावी म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभां’चे आयोजन करण्यात येणार आहे. या सभांच्या प्रसारासाठीच्या ‘होर्डींग्ज’ कलाकृती आणि २ प्रकारच्या निमंत्रणपत्रिका नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कराड शहरात विविध मंदिरांमध्ये सनातननिर्मित आकाशकंदिल लावून धर्मप्रसार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कराड शहरात विविध मंदिरांमध्ये सनातननिर्मित आकाशकंदिल लावून धर्मप्रसार करण्यात आला.

हिंदूंनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे करू नये, याविषयी प्रबोधन करणारे हस्तपत्रक, भित्तीपत्रक, होर्डिंग आणि हातात धरायचे फलक उपलब्ध !

हिंदूंनी पाश्‍चात्त्य प्रथेप्रमाणे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे न करता, हिंदु संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरे करावे, याविषयी प्रबोधन करणारे खालील प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध आहे.

पाकिस्तानने जगभरातील राजदूतावासांमध्ये उभारला ‘काश्मीर कक्ष’

पाकने काश्मीर कक्ष चालू करण्यामागे ‘विविध देशांत असलेल्या स्थानिक पाकिस्तानी नागरिकांना भडकावणे आणि खोट्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांचे कट्टरतावाद निर्माण करणे’, हा मुख्य हेतू आहे. हे कक्ष हिंसाचाराला उघड प्रोत्साहन देत असल्यामुळे ते बंद करायला हवेत.

दत्तजयंतीविषयी प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रबोधन करणारे पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर ठेवण्यात आले आहे.