
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या नदीकाठी साबण अथवा शॅम्पू यांच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. यासंदर्भात वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सूचना दिली असून भाविकांनी नदीत कोणतीही वस्तू टाकू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
खंड्रे पुढे म्हणाले की, पर्यावरणपूरक उपाय म्हणून तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी नद्या आणि तलाव यांच्याजवळ ५०० मीटर परिसरात साबण आणि शॅम्पू विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश मी दिले आहेत. नदीत स्नान करणारे भाविक नदीत शॅम्पूची पाकिटे टाकतात, तसेच साबणामुळे पाणी प्रदूषित होते. यामुळे लोकांच्या आणि जलचर प्राण्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. यात्रेच्या ठिकाणी कपडे टाकण्याची प्रवृत्ती निदर्शनास आल्याने यावर प्रतिबंध घालण्यासाठी कठोर नियम लागू केले जातील, असेही खंड्रे यांनी सांगितले.