नागपूर येथे पोलिसांवर आक्रमण करणार्‍या जिहादी मानसिकतेच्या गुंडांवर कडक कारवाई करा !

सकल हिंदु समाजाचे ठिकठिकाणी निवेदन

कोल्हापूर – नागपूर येथे पोलिसांवर आक्रमण करणार्‍या जिहादी मानसिकतेच्या गुंडांवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे, भाजपचे जयसिंगपूर शहर सरचिटणीस श्री. सुनील ताडे, श्री. सुमंत रत्नपारखे, मनसे महिला आघाडी शिरोळ शहर उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. अवधूत साळवी आणि श्री. योगेश नागावकर, विश्व हिंदु परिषद कुरुंदवाडचे श्री. गौतम पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कुरुंदवाडचे श्री. नंदकिशोर कुकडे यांसह अन्य उपस्थित होते.

जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड व  सांगोला येथील पोलीस ठाण्यात निवेदन देतांना मान्यवर, पदाधिकारी व धर्माभिमानी


सांगोला (जिल्हा सोलापूर) – याच मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी स्वीकारले. निवेदन देण्यासाठी सांगोला शहर आणि तालुक्यातील हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.