नागपूर येथील लक्ष्मी नारायण तांत्रिक संस्थेस प्रयोगशाळा आणि ‘इन्क्युबेशना’साठी निधी देऊ !

लक्ष्मी नारायण तांत्रिक संस्था , नागपूर

मुंबई  – ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’तील ‘लक्ष्मी नारायण तांत्रिक संस्थे’स प्रयोगशाळा आणि ‘इन्क्युबेशन’ विभागाकरता १ कोटी ७४ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यांच्या मागणीनुसार उर्वरित निधी दिला जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याविषयी राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी तारांकित प्रश्न मांडला होता.