MP Death Penalty For Conversion : धर्मांतर करणार्‍यांना फाशीची शिक्षा करणार ! – डॉ. मोहन यादव, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश

मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

भोपाळ (मध्यप्रदेश) – धार्मिक स्वातंत्र्य कायद्याद्वारे आम्ही धर्मांतर करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याचे प्रावदान (तरतूद) करत आहोत, अशी घोषणा मध्यप्रदेशाचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केली. ते आंतरराष्ट्रीय महिला दिनामित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की,

निष्पाप मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये सरकार अतिशय कडक धोरण अवलंबत आहे. या संदर्भात मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली आहे. जेणेकरून निष्पाप लोकांवर बलपूर्वक किंवा त्यांना आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यांना जगण्याचा अधिकार मिळू नये. यासमवेतच धार्मिक स्वातंत्र्य कायद्यात पालट करून लोकांचे धर्मांतर करणार्‍यांना मृत्यूदंडाची तरतूदही केली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील धर्मांतराच्या घटनांवर कडक लक्ष ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत धर्मांतर किंवा गैरवर्तन याला समाजात स्थान मिळणार नाही. या घृणास्पद कृत्यांना प्रोत्साहन देणार्‍यांशी सरकार कठोरपणे वागेल.

संपादकीय भूमिका

प्रत्येक राज्यांनी असा कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारनेच हा कायदा संपूर्ण देशासाठी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी आता हिंदूंनीही दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे !