थोडक्यात महत्त्वाचे : डंपरचालकाच्या धडकेत १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ! सिमेंट मिक्सरच्या अपघातात मुलीचा मृत्यू…

सीबीडी सेक्टर आठ येथील डंपरचालकाने सायकलवरून शाळेत जाणार्‍या १२ वर्षांच्या मुलाला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला.

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहितेच्या निर्णयाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा पाठिंबा !

श्री. सदा सरवणकर म्हणाले, ‘‘महासंघाचे कार्य पुष्कळ चांगले आहे. मंदिरे सरकारमुक्त व्हावी, असा आमचासुद्धा प्रयत्न आहे. आम्हाला भक्तांच्या सोयीसाठी, तसेच आरोग्य निधीसाठीसुद्धा न्यासाच्या निधीचा वापर करता येईल.

Jamaat-e-Islami Pakistan : भारत पाकच्या नागरिकांना ठार करत असतांना सरकार गप्प !

याचे कारण आता काळ पालटला आहे. आता भारत गांधीगिरी करत नसून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार वागत आहे. भविष्यात जगाच्या नकाशावरून पाकचे अस्तित्वच नष्ट करणे, हे भारताचे अंतिम लक्ष्य असणार आहे !

साई संस्थानमधील भोजनासाठी कूपन बंधनकारक !

शिर्डी येथील अन्नछत्रात मिळणार्‍या भोजनासाठी भाविकांना आता कूपन घेणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी शिर्डीत विनामूल्य भोजनासाठी थेट प्रवेश देण्यात येत होता; मात्र आता केवळ कूपन असलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

बिलासपूर (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती पाद्य्राचे धर्मांतराचे घृणास्पद कृत्य उघड : गुन्हा नोंद !

छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार असल्याने धर्मांतराच्या अशा घटनांवर पायबंद लागला पाहिजे, असेच हिंदु जनतेला वाटते !

Prayagraj MahaKumbh Stampede Inquiry : आतंकवादविरोधी पथकाचे १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष !

महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे प्रकरण अपघात नव्हे, तर त्यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आतंकवादीविरोधी पथक आणि इतर सुरक्षायंत्रणा यांनी अनुमाने १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष ठेवले आहे.

History Cannot Be Wiped Out : शेख हसीना यांच्या वडिलांच्या घराची तोडफोड, तर चुलत भावांची घरे पाडली !

बांगलादेशात ५ फेब्रुवारीच्या रात्री पुन्हा मोठा हिंसाचार झाला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाक्यातील ‘धनमोंडी-३२’ येथील निवासस्थानी आक्रमण करून प्रचंड तोडफोड करण्यात आली.

Shankaracharya Avimukteswarananda Saraswati : अल्पसंख्यांकांना धार्मिक शाळा उघडण्याचा अधिकार, तर हिंदूंना या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले !

धार्मिक शिक्षण हा आपल्या मुलांचा मूलभूत अधिकार आहे. आवश्यकता भासल्यास राज्यघटनेत सुधारणा करावी. धार्मिक शिक्षण हा आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग होता; पण स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या कलम ३० ने देशात पालट घडवून आणला.

पुणे शहरातील १९ खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना टाळे ठोकले !

गुइलेन बॅरे सिंड्रोमची (‘जी.बी.एस्.’ची) लागण झालेल्या सिंहगड रस्ता परिसरातील दूषित पाणीपुरवठा करणार्‍या १९ ‘आर्.ओ. प्लांट’ (खासगी पाणी शुद्धीकरण यंत्रणा) प्रकल्पांना टाळे ठोकण्यात आले आहे. या ठिकाणी पाण्यात क्लोरिनचे प्रमाण ० टक्के आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Tirupati Board Expelled Non-Hindu Employees : तिरुमला तिरुपती देवस्थानाने १८ अहिंदु कर्मचार्‍यांना काढून टाकले !

स्तुत्य निर्णय घेणार्‍या तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन !