४ जणांसह ४ इलेक्ट्रॉनिक यंत्रे पोलिसांच्या कह्यात
कुडाळ – ‘व्हिडिओ गेम’च्या नावाखाली जुगार चालू असलेल्या कुडाळ बसस्थानक समोरील ‘ओमसाई व्हिडिओ गेम पार्लर’वर पोलिसांनी २१ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता धाड टाकली. या वेळी पार्लरचे २ मालक, १ कामगार आणि १ जुगार खेळणारा, असे ४ जण आणि गेम पार्लरमधील ४ इलेक्ट्रॉनिक यंत्र (मशीन) कह्यात घेतली. पोलीस कर्मचारी फ्रीडन बस्त्याव बुथेलो यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. व्हिडिओ गेमच्या नावाखाली ‘ओमसाई व्हिडिओ गेम पार्लर’मध्ये जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.