मागील ५ वर्षांत बंदीवानांनी पलायन करण्याच्या १६ घटना; मात्र १० जणांनाच पुन्हा कह्यात घेण्यात यश

गोव्यात मागील ५ वर्षांत पोलीस कोठडी, पोलीस संरक्षण आणि कोलवाळ मध्यवर्ती कारागृह यांमधून बंदीवानांनी (कैद्यांनी) पलायन करण्याच्या एकूण १६ घटनांची नोंद झालेली आहे

गोव्यात बहुतांश देवस्थान समित्यांची बिनविरोध निवड

राज्यातील विविध देवस्थान समित्यांच्या निवडणुका ९ फेब्रुवारी या दिवशी झाल्या. ‘या निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात, या दृष्टीने सज्ज रहावे’, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी देवस्थानच्या प्रशासकांना दिले होते.

Manipur CM Resigns : मणीपूरचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांचे त्यागपत्र

मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सकाळीच भेट घेतली होती. गेल्या दीड वर्षापासून राज्यात चालू असलेल्या हिंसाचारावरून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात होती.

थोडक्यात महत्त्वाचे

पंडित दिनदयाळ मार्गावर चालू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी ७ फेब्रुवारीच्या रात्री २ मजूर आणि इतर यांच्यामध्ये जेवण सांडल्यावरून वाद झाला.

पर्वरी पोलिसांकडून पूजा नाईक यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट

सरकारी नोकरीचे आमीष दाखवून पैसे घेतल्याच्या प्रकरणी आतापर्यंत एकूण ३ आरोपपत्रे प्रविष्ट

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी मालिकेत हिंदु संत आणि देवता यांचे विडंबन !

‘या विषयाच्या संदर्भात सोनी टीव्हीने हिंदु समाजाची जाहीर क्षमा मागावी. अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू’, अशी चेतावणी अधिवक्ता अनिश परळकर यांनी दिली.

‘खान्देश’चे नाव ‘कान्हादेश’ करा !

‘खान्देशा’चे खरे नाव ‘कान्हादेश’ आहे, असा उल्लेख महाराष्ट्र सरकारच्या गॅजेटमध्ये आहे. याविषयीचे पुरावे इतिहासात सापडतात. त्याला पौराणिक संदर्भसुद्धा आहेत. यामुळे खान्देश हे नाव पालटून ‘कान्हादेश’ असे करावे, अशी मागणी खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Barabanki Forced Conversion : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलाची सुंता करून बनवले मुसलमान !

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुर्शीद, त्याचे वडील रियासत अली आणि आफिफा रेस्टॉरंटचा मालक यांच्याविरुद्ध धर्मांतर अन् शारीरिक शोषण असा गुन्हा नोंदवला. तसेच मुलाला बालसुधारगृहात पाठवले.

पुणे येथे ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’च्या हद्दीपासून काही मीटर अंतरावर आढळली पाकिस्तानी चलनातील नोट !

ही एका मोठ्या संभाव्य धोक्याची चेतावणी असू शकते. त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून योग्य ती कारवाई होणे आवश्यक !

नाशिकमध्ये कह्यात घेतलेल्या बांगलादेशींना नारायणगावातून आधारकार्ड !

पोलिसांच्या अन्वेषणात, आलीम मंडल, अलअमीन शेख आणि मोसीन या तिघांकडे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील कोळीमळा, भुजबळ चाळ येथील रहिवासी दाखल मिळाला,