चेन्नई येथे सीएए आणि एन्.आर्.सी. यांच्या समर्थनार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

येथे १६ फेब्रुवारीला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांच्या समर्थनार्थ ‘भारत हिंदु मुन्नानी’ या हिंदु संघटनेचे प्रमुख श्री. आर्.डी. प्रभु यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यात हिंदु मक्कल मुन्नानी, हिंदु सत्य सेना, अखिल भारतीय हिंदु महासभा, हनुमान सेना, हिंदु जनजागृती समिती आदी…

शांततापूर्ण आंदोलन करणार्‍यांना ‘गद्दार’, ‘देशद्रोही’ म्हणता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

शासनाच्या विरोधात निदर्शने करत आहेत, म्हणून त्यांची मुस्कटदाबी करणे चुकीचे आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करणार्‍यांना ‘गद्दार’, ‘देशद्रोही’ म्हणता येणार नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने व्यक्त केले आहे.

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यांकांची दयनीय अवस्था अन् त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याची आवश्यकता

नुकताच केंद्रशासनाने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला. या कायद्याच्या दृष्टीने सध्या सर्वत्र विरोधाचे आणि संतापाचे वातावरण आहे.

(म्हणे) ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे एकाच समाजाची चौकशी का केली जात आहे ?’ – सय्यदभाई, अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक समाज मंडळ

माझेही पूर्वज हे हिंदूच होते. (हे सय्यदभाई यांनी मान्य केले, तसे त्यांचे किती समाजबांधव हे मान्य करतील ? – संपादक) ते अरबस्थान किंवा इतर प्रांतातील नव्हते. मग नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे (सीएएद्वारे) एकाच समाजाची चौकशी का केली जात आहे किंवा त्यांचीच कागदपत्रे का मागितली जात आहेत ?

शाहीन बाग येथील धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करा !

नांदेड येथील जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सीएए आणि एन्.आर्.सी. यांच्या विरोधात ५ सहस्र ठिकाणी आंदोलन करण्याचे पी.एफ्.आय.चे षड्यंत्र

कायद्याच्या विरोधासाठी भारतातील जिहादी ५ सहस्र ठिकाणी आंदोलन करण्याचे नियोजन करतात. या उलट न्यायहक्कांसाठी लढा देण्यासाठी हिंदू किती ठिकाणी आंदोलन करतात ?

कोणालाही त्रास देऊन विरोध केला जाऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात येथील शाहीन बाग परिसरात धर्मांधांकडून गेले ६० हून अधिक दिवस अवैधरित्या रस्ता बंद करून धरणे आंदोलन केले जात आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर ‘कोणालाही त्रास देऊन विरोध केला जाऊ शकत नाही’, असे मत न्यायालयाने मांडले.

‘सीएए’ आणि ‘एन्.आर्.सी.’ यांच्या समर्थनार्थ कबनूर (इचलकरंजी) येथे भव्य पदफेरी

स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या पुढाकाराने नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी या दिवशी कबनूर (इचलकरंजी) येथे भव्य पदफेरी काढण्यात आली. या फेरीत भाजपचे माजी आमदार श्री. सुरेश हाळवणकर, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते

‘सीएए’ मुसलमानविरोधी नाही ! – अभिनेते रजनीकांत

केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (‘सीएए’चा) मुसलमानांवर कोणताही परिणाम होणार नाही. हा कायदा मुसलमान धर्मियांच्या विरोधात नाही. राजकीत पक्ष त्याचा अपप्रचार करत आहेत. राजकीय पक्ष विद्यार्थ्यांचा वापर सीएए विरोधातील निदर्शनासाठी करून घेत आहेत.

अमेरिकेतील सिएटल सिटी कौन्सिलमध्ये ‘सीएए’ आणि ‘एन्.आर्.सी.’ यांच्या विरोधात ठराव

अमेरिकेतील सिएटल सिटी कौन्सिलने ३ फेब्रुवारीला भारत सरकारने संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) यांच्या विरोधात एक ठराव सर्वसंमतीने संमत केला आहे.