मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी घेतला निर्णय

नवी देहली – आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने त्याच्या १८ अहिंदु कर्मचार्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’च्या (‘टीटीडी’च्या) नियमांविरुद्ध काम केल्याविषयी या सर्वांना दोषी ठरवण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापनाने सर्व १८ अहिंदु कर्मचार्यांसमोर दोन अटी ठेवल्या आहेत , एकतर त्यांनी दुसर्या सरकारी विभागात बदली घ्यावी किंवा स्वेच्छा निवृत्ती स्वीकारावी. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान मंडळाने सांगितले. ‘टीटीडी’चे अध्यक्ष बी.आर्. नायडू यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
Tirupati Temple Board Expels 18 Non-Hindu Employees to protect temple sanctity! 🚩
Congratulations to the Tirumala Tirupati Temple Management for this commendable decision 👏🏻@TTDevasthanams#TirumalaTirupatiDevasthanam pic.twitter.com/Tqw2TdM4xa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 6, 2025
तिरुपती देवस्थानात काम करतांना अहिंदु धार्मिक प्रथा पाळणार्या १८ कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. (सर्वधर्मसमभावाची टिमकी वाजवून मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये अहिंदूंच्या समावेशाचे समर्थन करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक) ‘टीटीडी’मध्ये काम करूनही ते सर्वजण अहिंदु धार्मिक परंपरांचे पालन करत होते. आता त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकास्तुत्य निर्णय घेणार्या तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन ! |