आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करा !

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी प्रविष्ट केलेली फौजदारी याचिका स्वीकारतांना ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी भाईंदर पोलीस ठाण्याला आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे निर्देश दिले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : मिरजमधून महाकुंभसाठी ३ विशेष रेल्वे गाड्या धावणार !

कुंभमेळ्याला जाणार्‍या भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक शनिवारी विशेष मोहीम राबवणार ! – राकेश दड्डणावर

नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे ?

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचारप्रकरणात २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश !

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्यावर असलेले आरोप मान्य करून करूणा मुंडे यांना दरमहा १ लाख २५ सहस्र रुपये पोटगी आणि लग्न होईपर्यंत मुलीला ७५ सहस्र देण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक येथे ६०० कामगारांमधून ८ बांगलादेशी नागरिक कह्यात !

प्रत्येक ठिकाणी हे बांगलादेशी घुसलेले आहेत.त्यामुळेच त्यांची संख्या लाखो-कोट्यवधींच्या घरात वाढत आहे ! हे वेळीच थांबवायला हवे !

श्री तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेऊ ! – डॉ. सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी, धाराशिव

या संदर्भात कायदेशीर आणि धार्मिक गोष्टींचा अभ्यास करून निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.

अहिल्यानगरमध्ये ‘श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट’द्वारे प्रथमच संत मीराबाई चरित्र कथा सोहळा !

‘संत मीराबाईंच्या जीवनचरित्राचे गुणगान पूज्य श्री राधाकृष्णजी महाराजांच्या अमृतवाणीमधून ऐकण्याची पर्वणी अहिल्यानगरकरांना लाभणार आहे. भाविकांनी विशेषतः युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे’, असे आवाहन श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

मुलुंड येथे सतर्क हिंदु महिलेने पकडून दिले संशयित बांगलादेशी मासेविक्रेते !

त्यांच्याजवळ आधारकार्ड असल्याचे सांगत होते. त्यानंतर नाईलाजाने त्यांनी आधारकार्ड दाखवले असता ते कोरे करकरीत आणि बंगाली लिपीत लिहिलेले आढळले.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रसिद्धीसाठी शासनाकडून ३ कोटी रुपयांचे प्रावधान !

राज्य शासनाने यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी २०० कोटी रुपयांचे प्रावधान केले असून त्यातील ३ कोटी रुपये योजनेच्या माध्यम प्रसिद्धीसाठी खर्च करण्यात येणार आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण, विधीवत् पूजन करून, तसेच रिमोटद्वारे कळ दाबून बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आला.