सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेली महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना, हे मानवतेसाठी महत्त्वाचे पाऊल ! – पू. अमित कुमारजी, रामाश्रम संस्था

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या प्रदर्शनकक्षात अतिशय सुंदर आणि सखोल माहिती देणारे, वैज्ञानिक पद्धतीने समजेल अशा भाषेत शास्त्राचे महत्त्व सांगणारे प्रदर्शन लागले आहे.

हिंदु राष्ट्राविषयी लावण्यात आलेले फलक का काढण्यात आले, हे प्रशासनाने स्पष्ट करावे ! – आचार्य महामंडलेश्‍वर जागृत चेतना गिरि, मातृशक्ती आखाडा

हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्राविषयी ठेवलेला विचार आपण सर्वांनी घ्यायला हवा. आपण सर्व हिंदु बांधवांसाठी हिंदु राष्ट्र असायला हवे. आपण सर्वांनी याविषयी जागृत रहावे.

वाढेफाटा (सातारा) चौकातील ‘हायमास्ट’ पथदीप बंद !

अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?

श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची आयकर विभागाकडून चौकशी !

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे चुलत बंधू तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने चौकशी चालू केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर अभिनेते राहुल सोलापूरकर यांची क्षमायाचना !

राहुल सोलापूरकर म्हणाले, ‘‘दोन मासांपूर्वी मी मुलाखत दिली. त्या दरम्यान इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात, याविषयी वक्तव्य केले होते. त्या मुलाखतीमध्ये बोलतांना मी ‘लाच’ हा शब्द वापरला. त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो.”

डॉ. सुरेश भोसले यांना ‘सातारा भूषण’ पुरस्कार घोषित !

रा.ना. गोडबोले (सार्वजनिक) ट्रस्ट आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने प्रतिवर्षी ‘सातारा भूषण’ पुरस्कार देण्यात येतो. वर्ष २०२४ चा ३४ वा‘ सातारा भूषण’ पुरस्कार कराड येथील डॉ. सुरेश भोसले यांना देण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात भूमीच्या व्यवहारातील महसुलात वाढ !

अटल सेतूच्या निर्मितीनंतर रायगड जिल्ह्यातील भूमींच्या खरेदी-विक्रीला गती आली आहे. पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग तालुक्यांचा एम्.एम्.आर्.डी.ए. विस्तारीत क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात १०० कर्तृत्ववान महिलांचा विशेष पुरस्काराने गौरव !

विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान १०० महिलांना ब्राह्मण महिला मंच, ‘घे भरारी फेसबुक ग्रुप’ आणि ‘यशस्वी उद्योजिका समूह’ यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, शेला, स्मृती चिन्ह असे होते.

थोडक्यात महत्त्वाचे : दौंड येथील महिलेची मुलुंड येथे आत्महत्या !, विद्यार्थ्यांच्या शालेय बसची भाडेवाढ !…

पुण्यातील दौंड येथील सुनीता येवले या ५३ वर्षीय महिलेने ४ फेब्रुवारीला मुलुंड येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली.

प्रणित मोरे या विनोदी कलाकारावर टोळक्याकडून आक्रमण

हिंदी चित्रपटसृष्टीतील नवोदित अभिनेते वीर पहारियावर विनोद केल्यामुळे त्याला मारहाण केल्याची ‘पोस्ट’ मोरे याने केली आहे. या घटनास्थळी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती. अभिनेता वीर पहारिया हा काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.