जर्मन नागरिकाकडून अंदाजे २४ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

वागातोर येथे ४५ वर्षीय जर्मन नागरिक सेबॅस्टियन हेस्लर याला अमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची बाजारातील किंमत २३ लाख ९५ सहस्र रुपये आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : परप्रांतीय धर्मांधाकडून अल्पवयीन मुलीवर…पाणीपट्टी थकवणार्‍यांची नळ- जोडणी !

उसाच्या गुर्‍हाळावर काम करणार्‍या परप्रांतीय समीर फरीदी याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली. त्याने मुलीला ‘तू मला आवडतेस. माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत बळजोरीने अत्याचार केला.

तिलारी धरणाच्या कालव्यातून रोणापालमध्ये पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याची माजी सरपंच सुरेश गावडे यांची चेतावणी

अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

सहकारी संस्थांचे उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना लाच घेतांना रंगेहात पकडले

लाचेची रक्कम पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून स्वीकारतांना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्याची व्यवहार्यता पडताळावी ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कृषी क्षेत्रात क्रांतीकारी पालट घडवून शेतकर्‍यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च अल्प करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स) वापर करण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे.

मुंबई महापालिकेचा ७४ सहस्र कोटींचा अर्थसंकल्प सादर !

देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी सादर केला. या बजेटमध्ये ७४ सहस्र ४२७.४१ कोटींचे प्रावधान करण्यात आले आहे.

आंतरशहरी रेल्वेगाड्या चालू करण्याची गोवा शासनाची योजना ! – मुख्यमंत्री सावंत

गोवा सरकार पुढील १-२ वर्षांत पेडणे ते काणकोण मार्गावर रेल्वेसेवा चालू करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

वाहतुकीस अडथळा ठरत असलेले बांधकाम पाडले !

महापालिका, पी.एम्.आर्.डी.ए., सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुकीला अडथळा ठरणारे ४० सहस्र चौरसफूट अतिक्रमण काढले.

Maharashtra Mandir Mahasangh : सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करा !

‘विद्येच्या मंदिरा’मध्ये (शाळेत) ड्रोसकोड (गणवेश) चालतो, ‘न्यायाच्या (न्यायालय) मंदिरा’त ड्रेसकोड (गणवेश) चालतो, तसेच ‘लोकशाहीच्या मंदिरा’तही (विधान भवन) येथे ड्रेसकोड चालतो, तर मग केवळ मंदिरातील ड्रेसकोडवर आक्षेप का ?

थकबाकी असणार्‍या मिळकतींवर महापालिका जप्तीची कारवाई करणार !

ही वेळ का येते ? त्या त्या वेळी करआकारणी पूर्ण करण्याचे ध्येय महापालिका का ठेवत नाही ?