(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
पुणे – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी ‘मार्तंड देवस्थान समिती’च्या विश्वस्तांची भेट घेत महासंघाच्या कार्याची माहिती दिली. या वेळी मार्तंड देवस्थान समितीचे विश्वस्त श्री. पोपट खोमणे, श्री. मंगेश घोणे आणि व्यवस्थापक श्री. आशिष बाठे उपस्थित होते. श्री. पोपट खोमणे यांनी सांगितले की, मंदिरांचे पावित्र्य राखले जावे, या दृष्टीने भाविकांमध्ये या संदर्भात जागृती व्हावी, यासाठी वस्त्रसंहिता सर्व मंदिरांमधून लागू करायला हवी. जेजुरी खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे श्रद्धास्थान असल्याने या मंदिरात लागू करण्यात आलेल्या वस्त्रसंहितेचा सर्व मंदिरांनी आदर्श घेऊन त्यांच्या देवस्थान आणि मंदिरातही वस्त्रसंहिता लागू करावी. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्य कौतुकास्पद आहे, मंदिर परिषदेत आम्ही सहभागी होऊ, असे त्यांनी आवर्जून सांगितले.