कामावर निष्काळजीपणा करणार्या ४-५ रुग्णवाहिका चालकांना निलंबित करणार ! – विश्वजित राणे
कामावर निष्काळजीपणा करणार्या उत्तर गोव्यातील ४-५ रुग्णवाहिका चालकांना निलंबित करण्यात येईल, असे वक्तव्य आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी केले. नुवे येथील एका वैद्यकीय शिबिराच्या वेळी ते बोलत होते.