श्री क्षेत्र ओझर येथे गणेश जयंती सोहळ्‍यास सहस्रो भाविकांची उपस्‍थिती !

विघ्‍नहर्त्‍या गणरायाचे मंदिर, गाभारा, आवार आणि मंदिराच्‍या बाहेरील परिसर गणेशभक्‍तांच्‍या प्रचंड गर्दीने अन् श्रींच्‍या नामघोषामुळे परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती जवळ येऊनही जळगाव पालिका प्रशासन निष्‍क्रीय !

१९ फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण महाराष्‍ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्‍साहात साजरी केली जाते; पण जळगाव येथील न्‍यायालय चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्‍याची अवस्‍था अतिशय बिकट असल्‍याचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी पुढे आणले आहे.

धार्मिकता, देशभक्‍ती जपणारे भारतीय हेच आपल्‍या संस्‍कृतीचा पाया ! – मीनाक्षी सहरावत, संस्‍थापिका, सनातन महासंघ आणि वैदिक मिशनरी 

धार्मिकता, देशभक्‍ती जपणारे भारतीय हेच आपल्‍या संस्‍कृतीचा पाया असून त्‍यांच्‍या आधारशिलेनेच भारत भविष्‍यात विश्‍वगुरु होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पंचदशनाम जुना आखाड्याच्या १६ संन्यासिनी आणि ११५ संन्यासी यांनी घेतली नागा साधूंची दीक्षा !

१ फेब्रुवारी या दिवशी पंचदशनाम जुना आखाड्याच्या १६ नूतन संन्यासिंनींनी नागा संन्यासिनींची, तर ११५ नूतन संन्यासींनी नागा साधूंची दीक्षा घेतली.

पुणे येथे मॅफेड्रोन आणि गांजा विक्री प्रकरणात २ धर्मांधांसह एकाला अटक !

पोलीस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी ‘अमली पदार्थमुक्‍त पुणे’ ही मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्‍तांच्‍या आदेशानुसार शहरातील अमली पदार्थ तस्‍करांविरुद्ध कारवाई करण्‍यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या रक्‍तगटाचे तरुण घडवणार्‍या श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानची धारातीर्थ यात्रा !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानची वर्ष २०२५ ची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत तानाजी मालुसरे समाधी (उमरठे) ते दुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्‍या दुर्ग रायगड (नरवीर मुरारबाजी देशपांडे समाधीमार्गे) होत आहे.

प.पू. मौनी महाराज यांनी घेतली काही घंट्यांसाठी भूसमाधी !

प.पू. अभय चैतन्य फलहारी मौनी महाराज यांनी २९ जानेवारी या दिवशी मृत्यू झालेल्या ३० भाविकांसाठी काही घंट्यांची भूसमाधी घेतली.

Prayagraj Flight Prices : ‘अकासा एअर’कडून प्रयागराजला जाणार्‍या विमानांच्या वाढीव तिकीट दरात ३० ते ४५ टक्के कपात !

‘इंडिगो’ आणि ‘अकासा’ यांनीच प्रयागराजच्या भाड्यांमध्ये केलेल्या वाढीमध्ये कपात केली आहे. केंद्र सरकारने सांगूनही अन्य आस्थापने दाद देत नाहीत, यावरून ‘त्या उद्दाम झाल्या आहेत कि व्यवस्थेमधील इच्छाशक्ती अल्प पडत आहे ?’

Nirdesh Singh Arrested Hate Speech :हिंदूंच्या देवता आणि महाकुंभमेळा यांना शिवीगाळ करणार्‍या निर्देश सिंह हिला अटक

हिंदूंच्या देवता, संत आणि महाकुंभमेळा यांना  शिवीगाळ करणार्‍या निर्देश सिंह उपाख्य दीदी हिला नोएडा येथून अटक करण्यात आली. प्रमोद सैनी यांच्या तक्रारीवरून माझोला पोलीस ठाण्यात सिंह हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Maruti Car On BioGas : ‘मारुति’ आस्थापनाने बनवली शेणाच्या गॅसवर चालणारी चारचाकी गाडी

‘मारुति’ या चारचाकी आस्थापनाने शेणाच्या गॅसपासून चालणारी चारचाकी गाडी बनवली आहे. ‘मोबिलिटी ग्लोबल एक्सपो २०२५’मध्ये ही गाडी प्रदर्शनासाठी ठेवली आहे. ‘फ्रोंक्स’ असे तिचे नाव आहे.