पुणे पथ विभागाच्या कामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करणार ! – मंत्री उदय सामंत

उदय सामंत

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – पुणे शहरात महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. शहरातील प्रत्येक कामाचे मेसर्स इ.आय.एल्. आस्थापनाद्वारे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात येणार असून त्यानंतरच देयकांची रक्कम देण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरात सांगितले. पुणे शहरातील वारजे माळवाडी येथील कामाविषयी सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य बापू पठारे यांनी सहभाग घेतला.