ग्रामदैवत श्री विशाल गणेशाला संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्याची निमंत्रणपत्रिका देऊन वाटपाचा शुभारंभ !

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टद्वारे अहिल्यानगरमध्ये पूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीने संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन ८ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉनमध्ये करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लाचखोर निरीक्षक अटकेत !

कराड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला खासगी व्यक्तीसह लाच स्वीकारतांना विभागाने रंगेहात पकडले. भीमराव शंकर माळी, असे कराड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षकाचे नाव असून मुस्तफा मोहिदिन मणियार असे त्यांच्या खासगी साहाय्यकाचे नाव आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका येथे ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवा !

महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका येथे ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवा, अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना पाठवण्यात आले.

कृष्णामाई महोत्सवाच्या निमित्ताने काढलेल्या फेरीला भाविकांचा प्रतिसाद !

कृष्णामाई महोत्सवाच्या निमित्ताने ‘श्री गणपति मंदिर ते कृष्णाघाट’ अशी फेरी काढण्यात आली. या फेरीला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. श्री गणेश मंदिरात कलशपूजन करण्यात आले.

गोव्यात गेल्या २ वर्षांत महिलांवरील अत्याचारांचे ६५३ गुन्हे नोंद

गोव्यात वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि अन्य अत्याचार यांसंबंधी ६५३ गुन्हे नोंद झालेले आहेत.

पहिला ‘लता मंगेशकर संगीत सेवा’ पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना प्रदान !

‘मंगेशकर कुटुंबियांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळणे, हे एका संगीत साधकासाठी अतिशय मोलाचे आहे. त्यामुळे ‘लता मंगेशकर संगीत सेवा’ या पुरस्कारासाठी मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो.

१० फेब्रुवारीपासून नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन !

प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्याने वरील कटू निर्णय आम्हाला घेण्यास प्रशासनाने भाग पाडले आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी व्यक्त केली.

‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’चा ससंर्ग रोखण्यासाठी अनधिकृत ‘आर्.ओ. प्लांट’ बंद करण्याचे महापालिकेचे आदेश !

गुईलेन बॅरे सिंड्रोम आणि आरोग्यविषयक समस्यांसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने खासगी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पडताळणी करण्यात आली.

नवी मुंबई महापालिकेच्या नावे वाहनतळात बेकायदेशीरपणे वसुली करणार्‍याला अटक !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘ए.पी.एम्.सी. मार्केट परिसरात वाहन ठेवण्याच्या शुल्काची बेकायदा वसुली’ या मथळ्याखाली दोनदा वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली होती.

वांद्रे येथील म्हाडा भवनात सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ !

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात बाळांना घेऊन येणार्‍या महिलांची तेथे स्तनपान किंवा बाळाच्या आरामाची जागा नसल्याने गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील म्हाडा भवनात सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आला आहे.