योगी आदित्यनाथ यांना बाँबने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका धर्मांधाला अटक

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सामाजिक माध्यमांवर बाँबने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी कामरान खान या तरुणाला महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने मुंबई येथून अटक केली होती.

नेपाळमधील माओवाद्यांना आर्थिक रसद पुरवणार्‍यास मुंबईत अटक

नेपाळमधील माओवाद्यांच्या संपर्कात असलेला अट्टल दरोडेखोर दलवीरसिंग बलवंतसिंग रावत उपाख्य पप्पू नेपाळी याला महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या जुहू येथील शाखेने अटक केली आहे.