Ban Chhawa Movie Says Shahabuddin : शाहबुद्दीन (म्हणे) ‘छावा’ चित्रपटामुळे देशात दंगली होत असल्याने त्याच्यावर बंदी घाला !’

‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी बरेलवी यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी

मौलाना शाहबुद्दीन रझवी बरेलवी

बरेली (उत्तरप्रदेश) – ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशातील वातावरण बिघडत चालले आहे. ‘छावा’ चित्रपटात मोगल शासक औरंगजेबाची प्रतिमा हिंदुविरोधी दाखवून हिंदु तरुणांना भडकवले जात आहे. त्यामुळेच हिंदु संघटनांचे नेते विविध ठिकाणी सम्राट औरंगजेबाविषयी द्वेषपूर्ण भाषणे देत आहेत. यामुळे दंगली उसळत आहेत. नागपूरमध्ये दंगल उसळण्यास हा चित्रपट कारणीभूत आहे, असा आरोप करत येथील ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे अध्यक्ष मौलाना (मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक) शाहबुद्दीन रझवी बरेलवी यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. तसेच ‘छावा’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मौलाना रझवी याने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटपटू महंमद शामी यांच्यावर रमझानमध्ये रोजा (उपवास) न ठेवल्यावरून आणि त्यांच्या मुलीने होळी खेळल्यावरून टीका केली होती. तसेच या मौलानांनीच महाकुंभमेळ्याची भूमी वक्फची भूमी असल्याची गरळओक केली होती.

औरंगजेबाला मुसलमान आदर्श मानत नाहीत !

मौलाना रझवी पुढे म्हणाले की, भारतातील मुसलमान औरंगजेबाला त्यांचा आदर्श किंवा नेता मानत नाहीत. आम्ही त्याला केवळ मोगल शासक मानतो, त्यापेक्षा अधिक काही नाही. (जर असे आहे, तर त्याच्या क्रौर्यावर का बोलत नाही ? त्यावर टीका का करत नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • दंगली हिंदूंमुळे नाही, तर मुसलमानांमुळे होत आहेत. त्यांना चित्रपटात दाखवलेले सत्य स्वीकारता येत नसल्याने ते दंगली घडवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मौलाना मागणी का करत नाहीत ?
  • मौलाना बरेलवी सातत्याने देशात अशांतता निर्माण करणारी विधाने करत असल्याने सरकारने त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना आतापर्यंत कारागृहात डांबणे आवश्यक होते. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे !