धर्मांतरास विरोध केल्यावरून भाजप नेत्याची हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक

मुसलमान धर्मप्रचारकांना हिंदूबहुल भागात इस्लामचा प्रसार करण्यास विरोध केल्याचा राग ठेवून काही धर्मांधांनी भाजपचे कार्यकर्ते रामलिंगम् यांची ५ फेब्रुवारीला निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५ धर्मांधांना अटक केली असून काही जण पसार (फरार) झाले आहेत.

कर्नाटकातील मंगळूरू येथे धर्मांध एसडीपीआय संघटनेच्या जिल्हाध्यक्षाच्या विरोधात गुन्हा नोंद

‘बाबरी मशीद परत मिळवूया’ अशा आशयाची राष्ट्रीय मोहीम राबवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी एस्डीपीआय (सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया) संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतावुल्ल जोकट्टे आणि इतर यांवर येथील उळ्ळाल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणार्‍या २ महिला ४ दिवस आधीपासून केरळ पोलिसांच्या सुरक्षेत असल्याचे उघड

केरळच्या कायीक्कोड येथील निवासी आणि माकपच्या कार्यकत्या बिंदू आणि मलप्पूरम् येथील निवासी कनकदुर्गा शबरीमला मंदिरात जाण्याच्या ४ दिवस आधीच मंदिरापासून काही घंट्याच्या अंतरावर असणार्‍या विराजपेटे येथे पोलिसांच्या सुरक्षेत पोहोचल्या होत्या.

रा.स्व. संघ-भाजपच्या ७ हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट’च्या आबिद पाशा टोळीवर कर्नाटक सरकार ‘मेहेरबान’ आहे का ?

कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दलाचे ‘सेक्युलर’ सरकार हिंदुत्वनिष्ठांविषयी पक्षपतीपणाचे धोरण राबवत आहे.

सात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या आबिद पाशा टोळीवर कर्नाटक सरकार ‘मेहेरबान’ का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) सरकारचे रा.स्व. संघ आणि भाजप यांच्या ७ कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्‍या ‘पीएफआय’च्या आबिद पाशा टोळीवर सरकार ‘मेहेरबान’ का ? – हिंदु जनजागृति समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा नेता असीम शरीफ याचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आर्. रुद्रेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपी तथा वादग्रस्त ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’चा नेता असीम शरीफ याने जामिनासाठी केलेला अर्ज राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या ….

केरळ येथे नाटकात मुलीने अजान दिल्याने मुसलमान संघटनांची निदर्शने

एका शाळेत आयोजित एका नाटकात मुलीने अजान दिल्याच्या विरोधात मुसलमानांनी निदर्शने केली.

सनातनवर बंदीची मागणी करणारे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विषयी गप्प का ?

भारतात न्यायामध्ये समानता असल्याचा दावा केला जातो; मात्र प्रत्यक्षात कर्नाटकातील विद्यमान काँग्रेस-जनता दल (निधर्मी) सरकार पोलीस आणि कायदा यांचा अपवापर करत असून विरोधी विचारसरणीच्या हिंदुत्वनिष्ठांना संपवण्याचे षड्यंत्रच त्याद्वारे …

आतंकवादी कारवाया करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घाला ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीच्या वार्ताहराने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांची मुलाखत घेतली. त्या वेळी झालेला वार्तालाप येथे देत आहे…

‘‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि रा.स्व. संघ शस्त्रांंचे प्रशिक्षण देतात !’’ – केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन्

केरळ राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि रा.स्व. संघ धार्मिक, तसेच सार्वजनिक ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत आहेत, असे विधान केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन् यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत सदस्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now