म्हापसा, २१ मार्च (वार्ता.) – हडफडे परिसरात अनधिकृत नाईट क्लब कार्यरत आहेत. या क्लबच्या दलालांची हडफडे परिसरात मनमानी चालू आहे. ‘गोवन नाईट क्लब’ या नावाने येथे चालू असलेल्या एका नाईट क्लबमुळे येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हणजूण पोलीस आणि पर्यटन खाते यांनी तात्काळ येथील नाईट क्लबवर कारवाई करावी, अशी मागणी हडफडे पंचायतीच्या सरपंच रोशन रेडकर यांनी केली आहे. सरपंच रोशन रेडकर म्हणाल्या, ‘‘ॲरनेस्टीना परेरा ही महिला ‘गोवन नाईट क्लब’ चालवत आहे आणि तिच्याकडे क्लब चालवण्यासाठी अनुज्ञप्ती नाही. नाईट क्लबच्या दलालांच्या मनमानीमुळे हडफडे परिसरात महिला आणि मुली यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.’’
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? |