
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – १७ मार्च या दिवशी नागपूर येथे जिहादी मानसिकतेच्या गुंडांनी पोलिसांवर दगडफेक केली, तलवार आणि कुर्हाड यांनी आक्रमण केले. यात अनेक पोलीस गंभीर घायाळ असून त्यात महिला पोलिसांचा समावेश आहे. या प्रकरणाचा सकल हिंदु समाज निषेध करत असून सकल हिंदु समाज महाराष्ट्र पोलीस दलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तरी या जिहादी समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने हुपरी पोलीस ठाण्यात देण्यात आले. हे निवेदन साहाय्यक पोलीस निरीक रावसाहेब हजारे यांनी स्वीकारले. (असे निवेदन का द्यावे लागते ? जिहादींवर कठोर कारवाई का होत नाही ? – संपादक)
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री महादेव आडावकर, विलास पाटील, संभाजी काटकर, नितीन शिंदे, किशोर कुंभार, ‘श्री सद्गुरु सेवाभावी संस्थे’चे श्री. रवींद्र गायकवाड, ‘श्री सद्गुरु गोशाळे’चे श्री. रोहन काजवे, श्री. संग्राम माने, बजरंग दलाचे संयोजक श्री. सुनील दळवे, विश्व हिंदु परिषदेचे संयोजक श्री. विजय काशीद आणि श्री. नीळकंठ माने, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सर्वश्री नितीन काकडे, ऋषिकेश दिवाण, शिवराज माळी, विशाळ गोंधळी, ‘शिवधर्म फाऊंडेशन’चे श्री. प्रसाद देसाई, उद्धव ठाकरे पक्ष युवासेनेचे श्री. लक्ष्मण पुजारी यांसह अन्य उपस्थित होते.
कोल्हापूर येथेही निवेदन !

कोल्हापूर – याच मागणीचे निवेदन कोल्हापूर येथे हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने पोलीस अधीक्षक मृत्यूंजय हिरेमठ यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, सर्वश्री वैभव कवडे, निखिल उलपे, अनिकेत पोवार, प्रविक डीसले, तुषार खोद्रे, सुनील शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.