तिलारीच्या सासोली येथील पोटकालव्याला गळती
तालुक्यातील तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणार्या डाव्या कालव्याच्या सासोली येथील पोटकालव्याला गळती लागली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
तालुक्यातील तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणार्या डाव्या कालव्याच्या सासोली येथील पोटकालव्याला गळती लागली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
‘चहात माशी पडल्याने तो चहा बदलून द्यावा, अन्यथा पैसे देणार नाही’, असे सांगितल्याच्या रागातून रूपेश बबन सपकाळ (वय ३३ वर्षे) या कात्रज, पुणे येथील पर्यटकाला कपडे फाटेपर्यंत काठीने मारहाण करून हातपाय बांधून ठेवण्यात आले.
मणीपूरचे मुख्यमंत्री एन्.बीरेन सिंह यांनी मंत्रीमंडळातील सहकारी आणि आमदार यांच्या समवेत त्रिवेणी येथे स्नान केले. कुंभमेळा म्हणजे भारतीय संस्कृती आणि श्रद्धा यांचा महान संगम आहे.
महाकुंभ आणखी २० दिवस चालू असणार आहे. तिन्ही अमृत स्नान पूर्ण झाले आहेत. १३ पैकी ७ संन्यासी आखाड्यांमधील नागा साधू आणि संन्यासी महाकुंभ येथून ७ फेब्रुवारीपासून काशी येथे जातील.
विनोदी कलाकार प्रणित मोरे याला येथे झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी आरोपी तन्वीर शेख याच्यासह त्याच्या १० ते १२ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रणित यांनी अभिनेते वीर पहारिया यांच्यावर विनोद केल्याने एका गटाकडून त्याला मारहाण करण्यात आली होती.
महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग (भूमी प्रतिबंध) कायदा’ आणण्यासाठी अध्यादेश काढावा, तसेच भूमी हडपण्याविरोधी विशेष पथकांची नेमणूक करावी, या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
ज्या ज्या भाविकांना कुंभमेळ्यात जाता आले नाही, त्यासर्वांना या महोत्सवाच्या निमित्ताने स्नान करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या नदीत आम्ही प्रयाग येथील पवित्र जल प्रवाहित करणार आहोत, तसेच येथे ११ पवित्र नदीतील जलांचे पूजनही केले जाणार आहे.
८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीमध्ये सनई-चौघडा वादन, भजन, तसेच वसंत पूजन आणि मंत्र जागर होणार आहे. या वेळी रसपानाचेही आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात औरंगजेबाचे भित्तीपत्रक, बॅनर लावणे किंवा झळकावणे आदी सर्वांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देऊन करण्यात आली.
धर्मशिक्षणाअभावी हिंदू पाश्चिमात्य विकृतीच्या आहारी जात आहेत. महिला धर्मपालन करत नसल्याने त्यांना अत्याचारांना सामोरे जावे लागते. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.