भोळ्याभाबड्या हिंदूंच्या मनात मूर्तीपूजेविषयी विष पसरवून मंदिरात केली जाणारी पूजा ‘सैतान’ असल्याचा दुष्प्रचार !
बिलासपूर (छत्तीसगड) – येथून पुन्हा एकदा ख्रिस्ती धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील संबलपुरी गावात पाद्री संतोष मोशे आणि त्यांची पत्नी अनु मोशे गरीब अन् बेरोजगार हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांना बलपूर्वक ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास भाग पाडत आहेत, अशी माहिती धर्मांतराला बळी पडलेल्या एका महिलेने दिली. यावरून पोलिसांनी मोशे पती-पत्नी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
१. संबलपुरी येथील रहिवासी उत्तराकुमार साहू यांनी सांगितले की, त्यांना ख्रिस्ती व्हायचे नाही; परंतु पाद्री आणि त्यांची पत्नी सतत त्यांचा ‘ब्रेनवॉश’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी त्यांच्या कुटुंबाला आणि सासरच्यांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास भाग पाडले अन् आता ते त्यांच्या मागे लागले आहेत.
२. साहू म्हणतात की, पाद्री आणि त्यांची पत्नी दोघेही आजारी, असाहाय्य, गरीब अन् दुर्बल हिंदूंना लक्ष्य करतात, त्यांना आमीष दाखवतात, त्यांना चर्चमध्ये बोलावतात, प्रार्थना करायला लावतात, त्यांच्या घरी प्रार्थनासभा घेतात आणि नंतर त्यांना साहाय्याचे आश्वासन देऊन त्यांचे धर्मांतर करतात. (ख्रिस्त्यांनी कसेही षड्यंत्र आखले, तरी हिंदूंमधील धर्मशिक्षणशून्यतेमुळे तेही याला बळी पडतात, हेही खरे ! – संपादक)
३. विशेषकरून महिलांना प्रार्थनासभेत एकत्र केले जाते आणि मूर्तीपूजेविरुद्ध विष पसरवले जाते. मंदिरात केली जाणारी पूजा कशी चुकीची आहे आणि प्रसाद घेणे म्हणजे ‘सैतान’ स्वीकारण्यासारखे आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. मग त्यांना देवाची मूर्ती तोडण्यास आणि देवी-देवतांच्या प्रतिमा असलेल्या टाइल्स उपटण्यास सांगितले जाते. (अशांच्या विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात धाडले पाहिजे ! – संपादक)
४. जे लोक ख्रिस्ती पंथापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना येशूच्या क्रोधाला घाबरण्यास सांगितले जाते.
५. उत्तराकुमार साहू यांच्या म्हणण्यानुसार हे ख्रिस्ती धर्मप्रचारक आता त्यांच्या मागे लागल्याने त्यांनी आरोपींच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (जागृत हिंदू असलेल्या उत्तराकुमार साहू यांचे अभिनंदन ! – संपादक)
६. ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याच्या बहुतेक तक्रारी चिंगराजपारा, चांटीडीह, सिरगिटी, पाचपेडी, बेलगहना, रतनपूर, सिपत, साक्री, हाफा, मोपका, घुरू, तिफ्रा मन्नाडोल, मास्तुरी, लाखराम आणि हार्दिका टोना या भागातून आल्या आहेत.
संपादकीय भूमिका
|